fbpx

सोयाबीन पिकांवरील चक्रभुंगा किडींचे व्यवस्थापन

विदर्भामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्वाची कीड आहे तरी शेतकरी बंधूनी सोयाबीन पिकाचे वेळोवेळी सर्वेक्षण करून ह्या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच ( ५ ते १० टक्के प्रादूर्भाव ग्रस्त झाडे ) नियंत्रणाचे उपाय योजावेत.

सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्वाची कीड आहे. या किडीचा मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकांपासून १ ते १.५ से. मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल ( चक्र ) काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामुळे चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ आणी फांदीतून आत जाते व मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव मूग, उडीद, चवळी या पिकांवर सुद्धा होऊ शकतो. पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पीक साधारणतः दीड महिन्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही पण कीड ग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते. या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच चक्रकाप तयार केलेली पाने देठापासून काढून टाकावीत आणि त्यांचा अंडी व अळ्यांसहित नाश करावा.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार

  • प्रोफेनॉफॉस ५० टक्के प्रवाही २० मिली किंवा
  • क्लोऱट्रंनीप्रोल १८.५० टक्के ३ मिली किंवा
  • इथियॉन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा
  • थायक्लो प्रिड २१.७ टक्के प्रवाही १५ मिली किंवा
  • ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मिली यांपैकी

कोणतेही एक कीटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवर स्प्रेयरने फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी.

About Author :
Dr. A.V.Kolhe,
Assoc.Prof.& Chief Pl.Prot.Officer,
Pl.Prot.& Surveillance Unit,
Department of Entomology,
Dr.PDKV, Akola 444 104 M.S.

You can find the contact details of Author at https://www.pdkv.ac.in/?page_id=5150#sthash.EG2Oyw6K.dpbs

Green Ecosystem Research Reference’s :

ALSO READ  Tissue Culture banana plantation technology Demo Plot

 

Disclaimer : This article is shared by Author with “Green Ecosystem” voluntarily, free of cost and for the purpose to be shared with everyone for free and Green Ecosystem doesn’t own / reserve any rights of this article, all rights remains with the author (as mentioned above) of this article. Contact info@greenecosystem.in with title of this article if any change.

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Preview
APEDA’s Recognised Laboratories for sampling, analysis for residues of agrochemicals / pesticides and GMO
pulses
Understanding terms and formulas used to decide the MSP by CACP & Government of India
सोयाबीन पिकांवरील चक्रभुंगा किडींचे व्यवस्थापन
Fssai, Food Safety and Standards Act, 2006