पशुसल्ला – गाय, म्हैस व कोंबड्यांसाठी लसीकरण वेळापञक – डॉ. लिना धोटे

कोणताही रोग झाल्यावर लागणाऱ्या खर्चाच्या पटीत लसीकरणाचा खर्च नगण्यच आहे. लसीकरणासाठी लागणारा वेळ आणि पैसा खूप कमी असल्याने त्यापासून होणारा फायदा लक्षात घेता जनावरांना होणाऱ्या रोगांची लस त्या-त्या ऋतूच्या आधी करून घेणे फायदेशीरच आहे .

लसीकरण केल्यामुळे फक्त लसीकरण केलेल्या जनावरालाच नाही तर त्या जनावरांपासून मानवाला होणाऱ्या रोगासही प्रतिबंध होण्यास मदत होते. उदा. रेबीज, ब्रुसेल्ला, लेप्टोस्पायरा, रिफ्ट व्हॅली फिवर, इन्फ्लुएंझा इत्यादी.

  • लसीकरणामुळे जनावरात आढळणाऱ्या रोगांची साखळी तोडली जाऊन त्याचा प्रसार थांबवण्यास मदत होते. संबंधित रोगांपासून होणारी आर्थिक हानी तसेच कष्ट वाचतात.
  • रोगांपासून जनावरे पूर्णपणे बरी होऊनसुद्धा वर्षानुवर्षे अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. उदा. लाळ्या-खुरकूत त्यामुळे अशा सगळ्या रोगांना प्रतिबंध हाच एकमेव चांगला उपाय ठरतो. योग्य प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.
  • प्रतिजैविकांच्या झालेल्या अतिरेकी गैरवापरामुळे प्रतिजैविकरोधी (रेसिसटंट) झालेल्या किंवा कोणतेही प्रतिजैविक वापरून नष्ट न होणारे किंवा त्यांना दाद न देणारे जिवाणू, विषाणू आज वातावरणात पसरले असताना त्यांचा नाश करणे अवघड झाले आहे.
  • बऱ्याच आजारांसाठी लागणाऱ्या लसी जवळील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून सवलतीच्या दरात मिळू शकतात; अन्यथा मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता भासल्यास ती लस संबंधिता मार्फत किंवा स्वत: विकत आणू शकतो.

गायी, म्हशीसाठी लसीकरण वेळापत्रक

टीप – लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

कोंबडयामधील लसीकरण वेळापत्रक

टीप – लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

लेखक:-
डॉ. लिना धोटे
पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक.

About The Author : Author Dr. Lina Dhote is an assistant professor with Bidar veterinary college, KVAFSU You can reach her through Linkdin at https://in.linkedin.com/in/lina-dhote-1020b2134

Disclaimer : This article is shared by Author with “Green Ecosystem” voluntarily, free of cost and for the purpose to be shared with everyone for free and Green Ecosystem doesn’t own / reserve any rights of this article, all rights remains with the author (as mentioned above) of this article. Contact [email protected] title of this article if any change.

Leave a Comment